चोरट्याला पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोलीसावर जीवघेणा हल्ला

पाचोरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ महिन्याच्या सुमारास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दिलीप पाटील आणि पोलीस नाईक सचिन पवार हे गस्तीवर होते. दरम्यान संशयित आरोपी अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी (वय-२२) रा. मलकापूर हा संशयितरित्या फिरत होता. त्यानंतर चोरी करून पळत होता. दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले. दरम्यान अशोकसिंग बावरी या संशयित आरोपीने पोलीस कर्मचारी सचिन पवार यांच्यावर लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यासंदर्भात पोहेकॉ दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करीत आहे.

Protected Content