शाळेत कुलूप तोडून चोरी तर सामानाची नासधूस

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका माध्यमिक विद्यालयात चोरट्यांनी कुलूप तोडून पंख्याची चोरी करून सामानांची नासधूस केल्याचे उघडकीस आले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील निर्मलाबाई दत्तात्रय तावरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २७ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी शिक्षक दालनाचे कूलूप तोडून सीलींग फॅन चोरून नेला तर गोदरेज कपाट तोडून नुकसान केल्याचे गुरूवारी २९ एप्रिल रोजी उघडकीला आले आहे. याबाबत शिक्षक अनिल सोनवणे यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकुंदा परदेशी करीत आहे.

Protected Content