पैशांचा वाद : तरूणाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड

अमळनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील रूपजी नगर परिसरात पैशांवरून एका तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून जखमी केले तर त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील रूपजी नगरात पैशांची भीसी लावण्यात आली होती. यामध्ये सुनील मगन भोई या तरूणासोबत रूपजी नगरातील चौघांसोबत वाद झाला. यामध्ये एकाने सुनील भोई यांच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून दुखापत केली, तसेच मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडला होता. दरम्यान जखमी झालेल्या सुनील भोई याला तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार घेतल्यानंतर अखेर रविवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे रतन रामकृष्ण महाजन, गोविंदा रामकृष्ण महाजन, राजू रामकृष्ण महाजन आणि रवी रामकृष्ण महाजन चौघे रा. रुपजी नगर अमळनेर यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content