गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे दिनांक १० व ११ फेब्रुवारी दरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी उद्घाटनप्रसंगी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील तसेच क्रीडा संचालक डॉ. आसिफ खान महाविद्यालयातील सर्व विभागाचे प्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट, फुटबॉल तर विद्यार्थिनींसाठी बॉक्स क्रिकेटचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना खेळाचे महत्व व त्या माध्यमातून होणारे शारीरिक व मानसिक बदल या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशा प्रकारच्या विविध मैदानी खेळांमध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे आहे असे सांगितले. वरील स्पर्धांत विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या विविध संघाने सहभाग नोंदविला होता.क्रिकेट इअँन्ड टीसी विजेता तर यंत्र विभागाचा युनिक स्ट्रायकर उपविजेता ठरला.बॉक्स क्रिकेट महिला रायल चॅलेंजर्स विजेता तर उपविजेता संगणक विभाग रनमेकर्स,फुटबॉल स्ट्रायकर्स प्रथम वर्ष तर तृतीय वर्ष पॉलीटेक्नीक संगणक उपविजेता ठरले. विजेत्या संघांचे गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ वैभव पाटील, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील कौतुक व अभिनंदन केले. सदर क्रीडा स्पर्धांसाठी क्रीडा संचालक डॉ. आसिफ खान यांचे मार्गदर्शन लाभले. स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. ललिता पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content