उर्वरित जलतरण स्पर्धेत पलोड विजेता तर बियाणी पब्लिक उप विजेता

WhatsApp Image 2019 08 20 at 6.54.53 PM

जळगाव, प्रतिनिधी | आज २० ऑगस्ट रोजी एकलव्य जलतरण तलावात झालेल्या उर्वरित आंतरशालेय जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील १३ शाळांनी सहभाग नोंदवला होता. एकूण १०० स्पर्धक या स्पर्धेत होते. ह्या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल ला ७५ गुण घेऊन मिळाले त्याचप्रमाणे उपविजेतेपद बियाणी पब्लिक स्कूल भुसावळ यांना ४९ गुण घेऊन मिळाले.

१४ वर्षाखालील मुलांच्या गटात  ५० मीटर फ्री स्टाइल   प्रथम ओम चौधरी १०० मीटर फ्री स्टाइल  कौशल्य केमेत  २०० व ४०० मीटर फ्री स्टाइल कुणाल चौधरी, ५० मीटर बॅकस्ट्रोक  निकेत चौधरी,  १०० मीटर बॅकस्ट्रोक  निकेत चौधरी, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक  सर्वेश शिंदे, २०० मीटर वैयक्तिक मिडले कुणाल चौधरी,  १४ वर्षातील मुली :५० मीटर फ्री स्टाइल  गार्गी पाटील , ५० मीटर बॅकस्ट्रोक  बबली पावरा,  १०० व २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक रुजुल शिरसाळे,

१७ वर्षाखालील मुले: ५० मीटर फ्री स्टाइल  पारस फालक , १०० मीटर फ्री स्टाइल  वर्धन जावडेकर,  २०० मीटर फ्री स्टाइल  प्रतीक चौधरी , ४०० मीटर फ्री स्टाइल  वर्धन जावडेकर. ५० मीटर बॅकस्ट्रोक  पियुष पटवारी  १०० मीटर बॅकस्ट्रोक  मनीष नेरकर, २०० मीटर बॅकस्ट्रोक  पियुष पटवारी, ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक  श्रीनिवास सिसोदे
,
१७ वर्षाखालील मुली : ५० मीटर फ्री स्टाइल  गंगा सोनवणे, १०० मीटर फ्रीस्टाइल,  नेहा बारेला.  २०० मीटर फ्रीस्टाइल  स्नेहल बारेला, ५० मीटर बॅकस्ट्रोक राजेश्वरी बारेला.  

१९ वर्षाखालील मुले :  ५० मीटर फ्रीस्टाइल गौरव सोनवणे , २०० मीटर फ्री स्टाइल   बापू हाके, १०० मीटर बॅकस्ट्रोक  रितेश तायडे.  स्पर्धेत पंच म्हणून कमलेश नगरकर, राजेंद्र ओक, अखिलेश यादव, भूषण तायडे, निलेश पाटील, कोमल पाटील, विशाल खैरनार, मनोज चौहान, गायत्री पारितोषिक वितरण समारंभास मनपा माजी सभापती व वन श्री पुरस्कार प्राप्त विजय वाणी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माजी वैद्यकीय अधिकार डॉ. प्रभा बडगुजर, संघटनेच्या अध्यक्षा रेवती नगरकर, सचिव फारूक शेख, क्रीडा अधिकारी रेखा पाटील उपस्थित होत्या. प्रास्ताविक फारूक शेख,सूत्रसंचालन कमलेश  नगरकर व आभार रेखा पाटील यांनी मानले.

Protected Content