बोदवड तालुका कोरोनामुक्त ! ; जिल्ह्यात आज ७ नवे रुग्ण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. यात आज बोदवड तालुका कोरानामुक्त झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ५० बाधित रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

जळगाव शहर-१, जळगाव ग्रामीण-०,  भुसावळ- ०, अमळनेर- ०, चोपडा- ०,  पाचोर- ०,  भडगाव- ०, धरणगाव- ०,  यावल -१, एरंडोल- ०,  जामनेर-०,  रावेर- ०,  पारोळा-१, चाळीसगाव-४, मुक्ताईनगर- ० आणि बोदवडा-०  असे एकुण ७ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

प्रशासनाने आज दिलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात बोदवड तालुका सर्वात आगोदर बोदवड जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे दिसून आले आहे. आजच्या अहवालानुसार आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार ४८७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९० हजार ७६७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज भडगाव तालुक्यातील एका बाधित रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर १४५ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

Protected Content