काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी कमलनाथ स्पर्धेत ?

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कार्यकारी अध्यक्षपदाबाबत कॉंग्रेस पक्षात अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. कॉंग्रेस सर्वात निष्ठावंत कमलनाथ याचा विचार करत आहे. कमलनाथ यांना ही जबाबदारी मिळाली तर ती कॉंग्रेसमधील मोठा बदल असेल.

 

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी आले आहेत. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी १० जनपथ येथे पोहोचल्या आहेत. या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. कॉंग्रेसमधील अंतर्गत कलहाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत कमलनाथ यांना मोठी जबाबदारी मिळू शकते तर निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्याविषयी बैठकीत चर्चा होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

 

सध्या केवळ कॉंग्रेसमध्ये कार्यकारी अध्यक्ष बनवण्याची चर्चा आहे. पावसाळी अधिवेशनानंतर पक्षाचे अध्यक्ष निवडले जातील असे म्हटले जात आहे. पुढील वर्षी अनेक राज्यात निवडणुका असून कॉंग्रेसमध्येही अनेक प्रकारच्या बातम्या सुरू आहेत. पंजाबमधील कलह देखील अजून संपलेला नाही. कॉंग्रेसमध्ये नाराज नेत्यांचा एक वेगळा गट पडला आहे.

 

दुसरीकडे बैठकीत प्रशांत किशोर यांच्याबद्दल होत असल्याची अंदाज लावण्यात येत आहे.प्रशांत किशोर यांनी मंगळवारी कॉंग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याशी चार तास चर्चा केली. त्यांना कॉंग्रेसमध्ये मोठ्या पदाची ऑफर देण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यांना कॉंग्रेसचा भाग बनून संघटन मजबूत करण्याचे सुचविले आहे. आता प्रशांत किशोर यांना निर्णय घ्यायचा आहे.

 

Protected Content