मनीषा कायंदे शिवसेनेत दाखल : मिळाली ‘ही’ जबाबदारी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी रात्री उशीरा शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्यावर लागलीच मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी गेल्या वर्षभरापासून अनेकदा शिंदे गटावर जोरदार टिकास्त्र सोडले होते. यामुळे त्या पुढे देखील ठाकरे यांच्या सोबतच राहतील असे मानले जात होते. तथापि, दोन दिवसांपासून त्या शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यातच काल त्यांनी शिवसेना-उबाठामधून हकालपट्टी करण्यात आली होती.

यानंतर विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी काल रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. . मनिषा कायंदे यांच्यासह चुनाभट्टी भागातील माजी अपक्ष नगरसेवक विजय तांडेल आणि त्यांच्या पत्नीनेदेखील शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार संजय शिरसाट देखील उपस्थित होते.
कायंदे यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना सचिव आणि पक्षप्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे.

Protected Content