जळगाव, प्रतिनिधी । संख्याबळ पाहता भाजपचे १२ नगरसेवक तर विरोधकांकडे ४ नगरसेवक होते. परंतु, निवडूणुकीला सामोरे न जाता शहराच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याची आम्ही विनंती केली होती. ती त्यांनी मान्य केली असे मत भाजप जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांनी पत्रकारांशी सवांद साधतांना व्यक्त केले.
स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील व महिला व बाल कल्याण समिती सभापती रंजना सपकाळे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप पक्ष कार्यालय वसंत स्मृती येथे जल्लोषानंतर आ. राजूमामा भोळे बोलत होते. जळगाव शहराचा विकास व्हावा या उद्देशाने राजकारण झाले पाहिजे. जेव्हा निवडणूक येईल तेव्हा समोरा समोर लढू, मात्र शहरच्या विकासासाठी आपले राजकीय जोडे बाहेर ठेऊन ही निवडणूक बिनविरोध झाल्याचा दावा आ. भोळे यांनी केला आहे.
नाथाभाऊ आम्हला आदरणीय
एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतर नंतरही कार्यलयात त्यांचा फोटो का आहे ? याबाबत विचारले असता आ. भोळे यांनी सावध भूमिका घेत वैयैक्तिक द्वेष नसून विचारांचा द्वेष असतो असे मत मांडले. नाथाभाऊंनी पक्षांतर केले तरी यांच्यावरील प्रेम कमी होणार नसल्याचे स्पष्ट करत ते मोठे नेते आहेत, नाथाभाऊ मला काल ही आदरणीय होते उद्या ही राहतील, पक्षीय राजकारणापेक्षा सर्वांच्या सुखदुःखात आपण सोबत राहिले पाहिजे अशी भूमिका घेतली. तसेच जो पक्ष राष्ट्र व समाजासाठी कार्य करेल आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत. भारतीय जनता पार्टीचे दैवत राम आहे. सोन्याची लंका त्याग करणारे श्री राम यांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही सत्तेसाठी काम करणारे कार्यकर्ते नसून राष्ट्रसाठी, समाज हितासाठी काम करणारे असल्याचे आ. भोळे यांनी स्पष्ट केले.