जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकजुटीने काम केल्यास जळगाव जिल्ह्यात कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त होऊन परत जिल्हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला बनणार असल्याचा आशावाद युवक कॉंग्रेस अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी व्यक्त केला.

आज पासून युवक कॉंग्रेसच्या वतीने विधानसभा निहाय जिल्हा दौर्याचं आयोजन जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केले आहे. त्यांच्या आजच्या जिल्हा दौर्यामध्ये प्रथम बैठक फैजपूर येथे रावेर यावल युवक कॉंग्रेस विधानसभेची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने संघटनेचा आढावा घेऊन आगामी काळामध्ये युवक कॉंग्रेसच्या वतीने रावेर व यावल तालुक्यामधील माझं गाव माझी शाखा या उपक्रमा अंतर्गत प्रत्येक गावामध्ये युवक कॉंग्रेसची शाखा उघडण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली. तसेच मोदी सरकार मुळे युवकांवरती जी बेरोजगारीची तलवार आलेली आहे त्यासंदर्भात मी बेरोजगार या उपक्रमा अंतर्गत विधानसभा मतदार संघातील युवकांचे मत जाणून घेण्याचा उपक्रम देखील हाती घेण्यात येणार आहे.

येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे पुढील काळामध्ये जास्तीत जास्त युवकांचे संघटन वाढवून बुद्ध यंत्रणा मजबूत करण्यासंबंधीचे मार्गदर्शन जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी बैठकीमध्ये युवकांना केले. यात त्यांनी एकोप्याने काम करण्याचे आवाहन केले.
बैठकीचे अध्यक्ष स्थानी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सचिव डॉ.शोएब पटेल व सोशल मीडिया चे जिल्हा अध्यक्ष मकसुद पटेल होते. आयोजक रावेर यावल युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्ष फैझान शहा होते..
सूत्रसंचालन जिल्हा महासचिव रामराव मोरे यांनी केले व आभार विधानसभा अध्यक्ष फैजान शाह यांनी मानले. या वेळी विधानसभा अध्यक्ष यांनी फैजपूर शहराअध्यक्षांचे नावाची घोषणा केली. फैजपूर येथील रहिवासी माजी उपनगरध्यक्ष वसीम मेहबूब तडवी यांना प्रदेश सचिव डॉ.शोएब पटेल व जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांचा हस्ते नियुक्ती पात्र देण्यात आले.
या वेळीस उपस्थित माजी नगरसेवक केतन किरंगे, देवेंद्र बेंडाळे, शहर अध्यक्ष रियाझ मेंबर, कलीम मेंबर, आसिफ मेकॅनिक,जिल्हा सरचिटणीस रामराव मोरे, एनएसयुआय जिल्हाउपाध्यक्ष हर्षल दाणी,डॉ दानिश, एजाज़ सर, अमोल चौधरी, कुणाल चौधरी, सागर चौधरी, टीनू सोनार, आदींनी तडवी यांचे अभिनंदन केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.