बजरंग बोगद्याजवळ धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । पिंप्राळा हुडको येथे राहणारा तरूणांने शहरातील बजरंग बोगद्याजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.

नातेवाईकांडून मिळालेली माहिती अशी की, पिंप्राळा हुडको परिसरात राहणार तरूण अविनाश शैलेंद्र सोनवणे (वय-२३) हा आपल्या दोन मोठे भाऊ आणि आई सोबत राहतो. अविनाशचे चायनिजचे दुकान असल्याने दुकानसाठी लागणारा किराणा दुपारीच आणला होता. किराणा ठेवल्यानंतर पुन्हा बाहेर पडला. काही कामानिमित्त दुचाकीने बाहेर पडला असेल अशी समजून घरच्यांची होती. दुपारी २ वाजेच्या सुमारास बजरंग बोगद्याजवळ रेल्वे खंबा क्रमांक ४१८/३-१ अप लाईनवर अविनाशने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती रेल्वे पोलीसांना मिळाली.

घटनास्थळी रेल्वे पोलीस पथक दाखल होवून मृतदेहाचा पंचनामा केला. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास मयताची ओळख पटली. दरम्यान अविनाशने आत्महत्या का केली याची माहिती मिळाली नाही. मयत अविनाश याचा काही दिवसांपुर्वीच साखरपुडा झाला होता. दोन महिन्यानंतर त्याच्या लग्नाची तयारीला देखील लागले होते. आत्महत्येची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रपरिवाराची जिल्हा रूग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, दोन मोठे भाऊ असा परिवार आहे.

Protected Content