चोपडा प्रतिनिधी । निमगव्हाण येथे तापीमाई चषक २०२० भव्य प्लास्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात चोपडा येथील श्री.साई अकॅडमी संघाने निमगव्हाणच्या श्री.भिलट देव संघास पराभूत करून तापीमाई चषक २०२० पटकावला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी न करता श्री.भिलट देव संघाने प्रतिस्पर्धी संघ श्री.साई अकॅडमी यास फलंदाजी दिली. यात श्री.साई अकॅडमी संघाने निर्धारीत ८ षटकात १४६ धावा केल्या यात सर्वात जास्त ६९ धावा सौरव पवार याने केल्या. प्रत्युत्तरात श्री.भिलट देव संघाने निर्धारीत ८ षटकात १३३ धावा केल्या यात श्री.भिलट देव संघाचा कर्णधार किरण पाटील याने सलग ५ षटकार ठोकले तर बंटी पाटील या खेळाडूने सर्वाधिक ६० धावा काढत उत्कृष्ट फलंदाजी केली.
परंतू तरी देखील विजय लक्ष १४७ धावा पुर्ण न करू शकल्याने श्री.भिलट देव संघाचा पराभव झाला व श्री.साई अकॅडमी संघ विजेता ठरून तापीमाई चषक २०२० चा मानकरी ठरला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे नेते घनश्याम अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, निमगव्हाणचे उद्योजक आर.सी.पाटील, सरपंच मंगला पाटील, उपसरपंच ज्योती कोळी, युवासेनेचे शहर संघटक नंदु गवळी, माजी उपसरपंच सुभाष बाविस्कर, पोलिस पाटील पवन भिल, दिलीप पाटील (बाबा), जगन नामदेव पाटील, रमेश पाटील, राजेंद्र पाटील, दिपक बाविस्कर, मधुकर पाटील, दिपक वामन पाटील, दोडे गुर्जर संस्थानचे विश्वस्त प्रविण पाटील, सागर पठार आदी मान्यवर उपस्थित होते.
यानंतर अंतिम सामन्यातील विजेता ठरलेल्या श्री.साई अकॅडमी संघास रोख रक्कम १११११ व स्मृतीचिन्ह व उपविजेता श्री.भिलट देव संघास रोख रक्कम ७७७७ व स्मृतीचिन्ह देवून तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून सौरव पवार, किरण पाटील, बंटी पाटील यांना रोख रक्कम देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेचे प्रायोजकत्व निमगव्हाणचे उद्योजक आर.सी.पाटील, ग्रामसेवक जनार्दन विसावे व तापी फाऊंडेशन यांनी स्विकारले होते तर वैष्णवी टेंट हाऊस, बाजीराव साऊंड सर्व्हिस व प्रमोद टेंट हाऊस यांचे सहकार्य लाभले. पंच म्हणून हर्षल पाटील (गोलू), प्रशांत अजित पाटील तर गुणलेखक म्हणून रोहीत पाटील यांनी काम पाहीले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आयोजक अनिल शिवाजी बाविस्कर, आनंद बाविस्कर, दिपक सैंदाणै, अरूण पाटील, हर्षल पाटील यांच्यासह संदीप पाटील, किशोर बाविस्कर, कोमलसिंग जाधव, जयेश बाविस्कर यांनी परीश्रम घेतले. स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम निमगव्हाण येथील श्री.धुनिवाले दादाजी दरबारच्या पायथ्याशी झाला. यावेळी गावासह परिसरातील क्रिकेट प्रेमी रसिक उपस्थित होते.