राजकोट वनडे : रोहितचा न्यू रेकॉर्ड

rohit sharma

राजकोट वृत्तसंस्था । राजकोट येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा वनडे सामना सुरु आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा याने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून नवा विक्रम केला असून रोहितने तब्बल सर्वात वेगाने ७ हजार धावा केल्या आहेत.

हिटमॅन रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात १८वी धाव घेताच त्याने वनडे क्रिकेटमधील सर्वात वेगाने ७ हजार धावांचा विक्रम केला. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने इतक्या वेगाने ७ हजार धावांचा टप्पा गाठला नाही. या क्रमवारीत रोहितने दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम अमला आणि भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले. वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मा ९ हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. त्याने खालच्या क्रमांकावर देखील फलंदाजीकरत २ हजार धावा केल्या आहेत.

Protected Content