महाराष्ट्राचे राज्यमंत्री कर्नाटन पोलिसांच्या ताब्यात

RAJENDRA PATIL YEDRAWKAR

इचलकरंजी वृत्तसंस्था । सीमा लढ्यात हुतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी कर्नाटकात गेलेले महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी मंत्री पाटील यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. बेळगाव शहरातील हुतात्मा चौकात हा प्रकार घडला आहे.

सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना दरवर्षी १७ जानेवारी रोजी बेळगावच्या हुतात्मा चौकात अभिवादन केले जाते. यासाठी मंत्री पाटील शुक्रवारी मध्यरात्रीच बेळगावात दाखल झाले होते. कोणताही सरकारी फौजफाटा न घेता ते बेळगावात पोहचले. महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तींनी बेळगावात येऊ नये यासाठी कर्नाटक पोलीस राष्ट्रीय महामार्गावर पहाटेपासूनच वाहनांची तपासणी करीत होते. मात्र मंत्री पाटील बेळगावात पोचले व ते हुतात्मा चौकात अभिवादन करण्यास हजर झाले. अभिवादान सुरू असतानाच त्यांना पोलिसांनी अडवून धक्काबुक्की केली व अटक केली. यावेळी तेथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला त्यामुळे तेथे तणाव निर्माण झाला.

Protected Content