जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगांव क्रीडा विभाग, आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट (पुरुष) २०१९ स्पर्धा के.सी.ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयात दिनांक २४ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु झाल्या. या स्पर्धेत जळगांव क्रीडा विभागातील एकूण १८ महाविद्यालयीन संघांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेतील पहिली लढत के.सी.ई. मणियार लॉं कॉलेज, जळगांव विरुद्ध डी. एन. कॉलेज फैजपूर या महाविद्यालयांमध्ये झाली.
या लढतीत डी. एन. कॉलेज फैजपूर ने उत्कृष्ठ खेळ करीत विजय संपादन केले. दुसरी लढत रायसोनी अभियांत्रिकी कॉलेज विरुद्ध पी.ओ. नाहाटा कॉलेज दरम्यान झाली यामध्ये पी. ओ. नाहाटा महाविद्यालयाने विजय संपादन केला. या संघातील डी. एन. कॉलेज फैजपूर संघ २७ नोव्हेंबर रोजी मू. जे. महाविद्यालयाविरुद्ध स्पर्धेसाठी मैदानात उतरेल. दिनांक २५ नोव्हेंबर रोजी के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालय विरुद्ध इकरा एच. जे. थीम महाविद्यालय तसेच एस.व्ही.पी. आर्ट्स एन्ड सायन्स महाविद्यालय विरुद्ध डी.डी.एन. भोळे महाविद्यालय अशी स्पर्धा झाली. यामध्ये उत्कृष्ठ सांघिक खेळाचे प्रदर्शन करून एस.व्ही.पी. आर्ट्स एन्ड सायन्स महाविद्यालय ऐनपूर व के.सी.ई. अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजय संपादन केला.