मी अपयशी ठरतो तेव्हा संघाचं ओझं – ख्रिस गेल

chris gayle

मुंबई वृत्तसंस्था । जेव्हा मी तीन-चार सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो, त्यावेळी ख्रिस गेल म्हणजे संघावरचं ओझं असतं, आणि माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट असतो. त्यावेळी मी सर्वात खराब खेळाडू ठरतो, म्हणूनच मी आता या गोष्टींना सरावले आहे, असे खुद्द ख्रिस गेलने पत्रकार परिषदेत सांगितले.

टी-२० क्रिकेट स्पर्धेत गेल सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, पण मझांसी सुपर लीग या स्पर्धेत मात्र त्याची कामगिरी अत्यंत सुमार होती. सहा सामन्यात गेलने केवळ १०१ धावा केल्या. त्यात त्याने केवळ एक अर्धशतक लगावले. त्यानंतर ख्रिस गेलने मझांसी सुपर लीगमधून माघार घेतली आहे.  गेल म्हणाला, मी केवळ एका संघाबाबत बोलत नाही. विविध टी-२० लीग क्रिकेट स्पर्धेत मी अनेक वर्षे खेळलेलो आहे. त्यानंतर मी असे अनुभवले आहे की, जेव्हा ख्रिस गेल धावा करत नाही, तेव्हा तो त्या संघासाठी ओझं ठरतो. याचाच अर्थ एक विशिष्ट खेळाडू संघासाठी ओझं ठरतो. ख्रिस गेल जेव्हा काही सामन्यात अपयशी ठरतो, तेव्हा गेलने आधी काय केले आहे हे सारे लगेच विसरतात. त्यावेळी मला थोडाही सन्मान मिळत नाही, असेही तो म्हणाला.

Protected Content