जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचे आयोजन

krida saptah news

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे कार्यालयामार्फत दरवर्षी 12 ते 18 डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार याही वर्षी क्रीडा कार्यालय व जिल्ह्यातील विविध शाळांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

केंद्र शासनामार्फत फिट इंडीया मुमेन्ट कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले असून त्यानुसार 12 ते 18 डिसेंबर दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करून क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. तसेच क्रीडा सप्ताह अंतर्गत गो-गर्ल गो ही मोहिम 6 ते 14 वयोगटातील मुलींकरिता राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये क्रीडा सप्ताह अंतर्गत फिट इंडीया मुमेन्ट व क्रीडा सप्ताहाचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. खेलो इंडिया या उपक्रमांतर्गत 5 ते 8 वयोगट व 9 ते 18 वयोगटातील मुलांकरिता शारिरीक क्षमता मुल्यमापन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्राथमिक शिक्षणाधिकारी, महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी व सर्व गट शिक्षणाधिकारी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील व तालुक्यातील समन्वयक व केंद्र प्रमुख यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

क्रीडा सप्ताह फिट इंडीया मुमेन्ट व गो गर्ल गो कार्यक्रमाची रुपरेषा

क्रीडा सप्ताहातंर्गत 12 डिसेंबर रोजी अनुभुती इंग्लिश मेडीयम स्कुल, जळगाव येथे सकाळी 10.30 वाजता उद्घाटन समारंभ व योगाभ्यास व विविध खेळांच्या स्पर्धा. 13 डिसेंबर रोजी महाराणा प्रताप विद्यालय, बोळे, ता.पारोळा येथे सकाळी 10.00 वाजता पारंपारिक खेळ प्रकार लेझिम, संगीत खुर्ची, लगोरी, लंगडी इत्यादि खेळाचे आयोजन. 14 डिसेंबर रोजी महाराणा प्रताप विद्यालय, जळगाव येथे सकाळी 11.00 वाजता विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने (कबड्डी, खोखो, मैदानी स्पर्धा) आयोजन. 15 डिसेंबर रोजी बहिणाबाई विद्यालय, जळगाव येथे सकाळी 11.00 वाजता क्रीडा मानसशास्त्र यांचे मार्गदर्शन व गिर्यारोहणाबाबत माहिती व विविध खेळांचे प्रदर्शनीय सामने. 16 डिसेंबर रोजी न. वा. मुलींचे हायस्कुल, जळगाव येथे सकाळी 11.00 वाजता गो गर्ल गो उपक्रमांतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलींकरिता पारंपारिक खेळ प्रकार (मंगळागौरी, फुटबॉल, योगा, दोरी उड्या), 17 डिसेंबर रोजी स्वामी विवेकानंद ज्यु. कॉलेज, जळगाव येथे सकाळी 10.00 वाजता क्रीडा विषयक चर्चासत्र राज्य व राष्ट्रीय खेळाडूंचे समवेत संवाद कार्यक्रम. 18 डिसेंबर राजी खुबचंद सागरमल विद्यालय, शिवाजीनगर, जळगाव येथे दुपारी 4.00 वाजता क्रीडा सप्ताह समारोप व बक्षिस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षित यांनी कळविले आहे.

Protected Content