छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा चाळीसगावात निषेध

chalisgaon news

चाळीसगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करणाऱ्या रविशंकर प्रसाद यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीचे निवेदन चाळीसगाकरांनी तहसीलदारांना दिले. तसेच संविधानबाबत अपशब्द वापरणाऱ्या रामदेव बाबाचा निषेध व्यक्त केला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने निवडणुका जिंकून सत्तेत बसायचे आणि नंतर त्यांच्याच नावाचा एकेरी उल्लेख करायचा अशा घटना घडतांना राज्यात दिसून येत आहे. यापुर्वी एका वृत्तवाहिनीवर अभिनेता अमिताभ बच्चन याने शिवरायांचा एकेरी उल्लेख केला होता. याचा निषेध करता त्यांना महाराजांचे नाव एकेरी घेतले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच भाजपाचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अनेकदा केला. हा अपमान महाराष्ट्रातील शिवप्रेमी कधीही खपवून घेणार नाही. रविशंकर यांनी जनतेची जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा चाळीसगावकरांनी निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर गणेश पवार, खूशाल पाटील, ज्ञानेश्वर कोल्हे, मुकुंद पवार, ए.बी.पाटील, समाधान मंडोरे यांच्यासह शहरातील नागरीकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content