भुसावळात मध्यरात्री इलेक्ट्रीक दुकान फोडले (व्हिडीओ)

Bhusawal news

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मुख्य बाजारपेठेत मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी इलेक्ट्रीक दुकान फोडून 16 हजार रूपये रोखसह इतर सामान चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील मुख्य बाजारपेठेतील डिस्को टॉवर व बाजूला असलेले डिस्को इलेक्ट्रिकल स्क्वेअर पार्टच्या दुकानात मध्यरात्री 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून चोरी केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. बाजारपेठेतील मुख्य चौकात असलेल्या दुकानात चोरी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे 16 हजार रुपये रोख व काही मोबाईल इलेक्ट्रिकल पार्ट चोरी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बाजारपेठ पोलिसांनी पाहणी केली असून तपासाअंती नेमकी किती रक्कम कुठल्या वस्तू चोरी झाल्या हे स्पष्ट होईल.

Protected Content