जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी शाहूनगर व रिंगरोड परीसरात प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी नागरीकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.
यापरीसरात मतदार नोकरदार, व्यापारी व व्यवसायिक याप्रकारचे वर्ग असतात. उमेदवारी अभिषेक पाटील यांनी प्रतिक्रिया जाणून घेतले असता, दैनंदिन आयुष्यात उद्भवणाऱ्या समस्या त्यांना येत असतात. या अडचणी लोकप्रतिनिधीनी सोडवणे त्यांचे कर्तव्य असते. स्वच्छता आणि रस्ते यासारख्या मूलभूत सोयीसुविधांचे सामान्य प्रश्न या नागरिकांचे आहेत. सत्ताधारी मात्र आश्वासने देऊन झुलवत ठेवत असल्याचा त्यांचा रोष आहे. यावेळी मात्र विकासाचा खरा अर्थ सांगून कृतीशीलता जपणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पाठिशी ते असल्याचं सांगतात. नागरीकांच्या समस्या जाणून घेत सेवेची संधी दिल्यास त्या पुर्ण करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी मतदारांना सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.