गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालयात “ग्रीन डे” साजरा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्या मंदिरामध्ये ग्रीन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पूर्ण विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले होते.

 

हिरवा रंग सुपीकता ,समृद्धी ,हिरवळ आणि आपला सुंदर निसर्ग दर्शवतो.पर्यावरणाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. पर्यावरण आपल्याला सर्व काही देते ,श्वास घेण्यासाठी हवा देते ,सुंदर घटना पाहण्यासाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी.  त्याच्या बदल्यात पर्यावरण आपणास काहीही मागत नाही. परंतु ते नेहमी निरोगी ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपले पर्यावरण स्वच्छ ठेवणे आणि ते प्रदूषण विरहित ठेवण्याचा प्रयत्न करणे ही आपली जबाबदारी व कर्तव्य आहे  असा संदेश मुख्याध्यापिका धनश्री फालक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

 

वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष विद्यार्थी यावेळी वृक्षारोपणासाठी घेऊन आले तर शाळेतर्फे सुद्धा विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आली.   कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content