दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंगरोडवरील बडोदा बँकेसमोर पायी जात असलेल्या महिलेला झोमॅटोच्या दुचाकीधारकाने जोरदार धडक दिल्याने गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संगिता महेश लढे वय ५४ रा. रिंगरोड, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता रिंगरोडवरील रस्त्याने जात असतांना त्यांनी झोमॅटो दुचाकीने जात असलेल्या अज्ञात दुचाकीस्वाराने महिलेला जोरदार धडक दिली. या धडकेत महिलेच्या मानेला गंभीर दुखापत झाली. त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १० फेब्रुवारी रेाजी सकाळी ११ वाजता अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संतोष सोनवणे हे करीत आहे.

 

Protected Content