खेळ खल्लास…! : राज्यपालांकडे राजीनामा देतोय : फडणवीस

fadnvis pawar

मुंबई प्रतिनिधी । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. यामुळे गुपचुप व बेकायदेशीरपणे सत्तारूढ झालेल्या भाजपला जोरदार दणका बसला आहे. अर्थात, आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

 

आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने महाआघाडीला दिलासा देणारा निर्णय दिल्याने राजकीय स्थिती प्रचंड वेगाने बदलली. या माध्यमातून भाजपला बहुमत सिध्द करण्यासाठी अनेक अडचणी येतील हे स्पष्ट झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, निकाल येताच दोन तासांमध्ये अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून दिला. यानंतर दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची माहिती दिली.

 

भारतीय जनता पक्षाने अतिशय गुप्त पध्दतीत राष्ट्रपती राजवट उठवून भल्या सकाळीच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती. यानंतर भाजप नेत्यांनी सातत्याने आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. तेथे आज सकाळी भाजपला हादरा देणारा निकाल आल्याने त्यांचे बहुमत सिध्द होऊ शकणार नाही हे स्पष्ट झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे अर्थातच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

 

तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चर्चेचं गुऱ्हाळ सुरू ठेवलं होतं. त्यामुळे अजित पवार यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा एक गट आमच्याकडे आल्याने आम्ही त्यांच्या पाठिंब्यामुळे सरकार बनवले. आज सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश आम्हाला दिले. मात्र, आज सकाळी अजित पवार मला भेटले आणि त्यांनी काही कारणामुळे राजीनामा देत असल्याचं सांगितले.  त्यामुळे आमच्याकडे संख्याबळ उरले नसल्याने मीही राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असून थोड्याच वेळात राज्यपालांना भेटून मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तर राज्यात आम्ही एक सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

आज दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दिल्याची माहिती समोर आली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाला बहुमताची जुळवाजुळव करणे अवघड असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्‍वभूमिवर, अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेणार असून यात ते आपल्या पदाचा राजीनाम्याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

Protected Content