सामूहिक बलात्कार प्रकरणातील दुसरा नराधम अटकेत

Live Trends News

जळगाव प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीत राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारे दोन्ही आरोपीपैकी फरार असलेला अरोपीस आज राहत्या घरातून ताब्यात घेतले. गणेश कमलाकर सुर्वे (वय-19) रा. रामेश्वर कॉलनी असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यापुर्वी काल सोमवारी संशयित आरोपी प्रकाश सुरेश नागपुरे रा. रामेश्वर कॉलनी याला अटक केली होती.

अशी आहे घटना
रामेश्वर कॉलनीत राहणारी ही अल्पवयीन तरुणी आहे. ती तीच्यावर अत्याचार करणारे गणेश व प्रकाश हे दोघे जण रिक्षाचालक असून ते देखील त्याच परिसरात राहतात. रविवारी दुपारी गणेश याने तरुणीस घराबाहेर बोलावून फिरायला जाण्यासाठी रिक्षेत बसवले. यावेळी प्रकाश रिक्षा चालवत होता. काही वेळातच तीघे जण कुसुंबा येथील गोशाळेत पोहाचेले. सुमारे तासभर या परिसरात फिरल्यानंतर ते पुन्हा घरी येण्यासाठी निघाले होते. यावेळी प्रकाश याने अयोध्यानगर भागातील एका निर्मनुष्य शेतात रिक्षा नेली. तेथे रिक्षातच दोघांनी तरुणीवर सामुहिक अत्याचार केले. स्वत:चा बचाव करण्यासाठी या तरुणीने प्रचंड आरडा-ओरड केली. परंतू, तेथे कोणीही नसल्यामुळे तीच्या मतदीला कोणी आले नाही. अत्याचार केल्यानंतर दोघांनी तरुणीस पुन्हा रिक्षाने रामेश्वर कॉलनीत सोडले होते. या तरुणीने घडलेला प्रकार कुटुंबियांना सांगीतल्यानंतर रात्री उशिरा एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन सोमवारी पहाटे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, गोविंदा पाटील, असीम तडवी व होमगार्ड नेरकर यांच्या पथकाने रात्रीच प्रकाश याला सोमवारीच अटक केली. तर आज गणेश सुर्वे याला देखील एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

Protected Content