रायसोनी नगरातून बुलेट मोटारसायकलची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रायसोनी नगरात असलेल्या साईविहार इमारतीच्या आवारातून ७० हजार रुपये किंमतीची बुलेट मोटरसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत मंगळवारी ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, संतोष बाबुलाल निकुंभ (वय-६५) रा.साईविहार अपार्टमेंट, रायसोनी नगर, जळगाव हे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. २७ नोव्हेंबर रात्री २ ते ६ डिसेंबर सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान त्यांची बुलेट मोटरसायकल क्रमांक (एमएच 14 जेएस 8935) त्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगला लावलेली होती. ही ७० हजार रुपये किमतीची बुलेट मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. याबाबत संतोष निकुंभ यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवार ६ डिसेंबर दुपारी १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुशील चौधरी करीत आहे.

Protected Content