रामदास कॉलनीतील घरातून दोन लॅपटॉपची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामदास कॉलनीतील निरामय अपार्टमेंटमधील तरूणाच्या घरातून ६० हजार रूपये किंमतीचे दोन लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे मंगळवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आले. याबाबत रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल वसंत पाटील (वय-२१) रा. अमळनेर ह.मु.निरामय अपार्टमेंट, रामदास कॉलनी जळगाव हा करून शिक्षण घेत आहे. मंगळवारी ६ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घसून ६० हजार रूपये किंमतीचे दोन लॅपटॉप चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर विशाल पाटील याने अपार्टमेंटचा परिसरात सर्वत्र शोध घेतला परंतू त्याला काहीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर रात्री १० वाजता रामांनदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. तरूणाच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवांनद साळुंखे करीत आहे.

Protected Content