यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील थोरगव्हान येथील एका विवाहीवर तिच्याच बहीनीच्या जेठाने सलग दोन वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून रविंद्र दिलीप पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
तालुक्यातील थोरगव्हान येथील एका २९ वर्षीय विवाहीला गावातीलच तीच्या बहीनीचा जेठ रविंद्र दिलीप पाटील याने तुझे गावातील एका इसमाशी अनैतीक संबध आहेत. समाजासह गावात तुझी बदनामी करेल आणि तुझ्या आई-वडीलास जीवे ठार मारील, अशी धमकी देत सुमारे दोन वर्ष अत्याचार केला,असे पिडीत विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयीत आरोपी रविंद्र दिलीप पाटील याच्या विरूध्द भादवी कलम ३७६, ३७६ (१), ५०६, ५०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार जीतेंद्र खैरनार, हे. कॉ. संजय तायडे व सहकारी करीत आहेत.