शामकांत पाटील लेवा फाऊंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी

सावदा : प्रतिनिधी । सुकन्या सामाजिक शैक्षणिक संस्था संचालित लेवा पाटीदार फॉऊंडेशनच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सावद्याचे शामकांत पाटील यांची निवड नाशिक झोनचे अध्यक्ष नितिन झोपे यांनी केली आहे

श्यामकांत पाटील यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले सुकन्या सामाजिक शैक्षणिक संस्था संचालित लेवा पाटीदार फॉऊंडेशन लेवा पाटीदार समाजाचा सर्वांगीण विकास हे ब्रीद घेऊन काम करीत आहे . या फाऊंडेशनच्या नाशिक, धुळे ,नंदुरबार, जळगाव , औरंगाबाद कार्यक्षेत्राच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सावदा येथील माजी नगरसेवक पत्रकार शामकांत पाटील यांची नियुक्ती नाशिक झोनचे अध्यक्ष नितीन झोपे यांनी आज केली.

मी लेवा समाज मजबुत करण्यासाठी व या समुदायाच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे सर्वांच्या योगदानाने समाज ताकदीने उभा राहतो असा माझा दृढ विश्वास आहे सर्वांना सोबत घेऊन कार्य एकनिष्ठेने करेल लहान — मोठ्याना विश्वासात घेऊन लेवा समाजासाठी काम करणार आहे असे नूतन प्रदेश उपाध्यक्ष शामकांत पाटील यांनी सांगितले

Protected Content