शहरात गावठी दारूची विक्री करणाऱ्या आणखी एका महिलेवर कारवाई

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज शहरात गेंदालाल मिल परिसरात गावठी दारूची बेकायदेशीर विक्री केल्या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरातील जाखनी नगरात अशाच पद्धतीने गावठी दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून ६०० रुपये किमतीची १० लिटर हातभट्टी दारू हस्तगत केली आहे.

शहरातील सिंधी कॉलनी परिसरात असलेल्या जाखनी नगरात बेकायदेशीर गावठी दारूची विक्री करणाऱ्या महिलेवर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारू हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “शहरातील सिंधी कॉलनी रोडवर असलेल्या जाखणी नगर येथे लक्ष्मी संजय अभंगे ही महिला बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी मिळाली.

त्यानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोहेकॉ प्रदीप पाटील, योगेश सपकाळे, सुनील सोनार, छगन तायडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल सपना येरगुंटला आणि किरण पाटील यांनी रविवारी २९ मे रोजी कारवाई करत बेकायदेशीर दारूची विक्री करत असलेल्या महिला दारू विकत असताना छापा टाकला.

यावेळी लक्ष्मी अभंगे या महिलेकडून १० लिटर ६०० रुपये किमतीची दारू जप्त केली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content