मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. संजय दत्तच्या ‘डॉगहाऊस’ या आगामी सिनेमात तो अभिनेता म्हणून दिसेल असं बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ‘डॉगहाऊस’ हा मल्टीस्टारर सिनेमात सुनील शेट्टी, इमरान हाश्मी आणि आर. माधवन यांच्यासह धोनीदेखील दिसणार असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. क्रिकेटमधील उत्तम करिअर करत मोठ्या पडद्यावर झळकणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिला क्रिकेटपटू नाही. जसे ‘क्रिकेटचा देव’ मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ हा सिनेमा आला. ‘कॅप्टन कूल’ च्या आयुष्यावर ‘एम. एस धोनी: द अनटॉल्ड स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ‘मॅचफिक्सिंग’च्या आरोपामुळं कारकीर्द संपुष्टात आलेल्या मोहंमद अजहरुद्दीन या क्रिकेटपटूवरचा ‘अजहर’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. प्रेक्षकांनीही या सगळ्या चित्रपटांना उत्तम प्रतिसाद दिला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मोहंमद अजहरुद्दीन यांच्यावरील चरित्रपटांनतर चर्चा आहे. आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला पडद्यावर पाहण्यासाठी धोनीचे फॅन्स उत्सुक आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर तुफान फटकेबाजी करणारा हा ‘कॅप्टन कूल’ आता अभिनेता म्हणून काय कमाल दाखवतोय याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना लागलेली आहे