


मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडीतील एक मोठा नेता आमच्या संपर्कात असून महाराष्ट्रातही राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
मध्यप्रदेशात ऑपरेशन लोटस यशस्वी होतांना दिसत असल्याने अन्य राज्यांमधील विरोधी पक्षाची सरकारे सतर्क झालेली आहेत. या पार्श्वभूमिवर, न्यूज-१८ या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मध्य प्रदेशात झालेल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटतील असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत आल्यास राज्यात मजबूत सरकार अस्तित्वात येईल. तसेच असं काही न घडल्यास लवकरच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिनही पक्षात बंडखोरी होईल असा दावा रामदास आठवले यांनी केला आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचा एक मोठा नेता आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट देखील रामदास आठवले यांनी यावेळी केला आहे.


