विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेलेल्या उमेदवाराला दंड

newasa tahasil news

शिर्डी वृत्तसंस्था । विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लास्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथे हा प्रकार घडला आहे. नेवासा तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. एखाद्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल करताना दंड होण्याची राज्यातील ही पहिली घटना असल्याचे बोलले जात आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु होताच प्लास्टिक बाळगल्याने नेवासा नगरपंचायतीने ही कारवाई केली. सोमवारी देवगाव येथील मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजाराची चिल्लर आणली होती. त्यामध्ये पाचशे रुपयाचे वीस बंडल प्लास्टिक पॅकेटमध्ये आणले होते.

प्लास्टिक बंदी असताना सदरची रक्कम ही प्लास्टिकमध्ये आणल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे आणि नगरपंचायतचे मुख्याधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक अधिकारी समीर शेख यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुंगसे यांना पाच हजाराचा दंड ठोठावला. दंड भरताना एक हजाराची चिल्लरसह पाच हजार रुपये भरुन दंडाची पावती आणि उमेदवारी अर्ज भरताना एक हजाराच्या चिल्लरसह दहा हजाराची अनामत रक्कम मुंगशे यांना भरावी लागली. नेवासा येथे नगरपंचायत आहे. नगरपंचायत असूनही येथे प्लास्टिकविरोधी फार कारवाई झालेली नाही.

Protected Content