अनिल पाटलांसह तिघे राष्ट्रवादीसोबतच !; मुंबईच्या मार्गावर

ncp mla

मुंबई प्रतिनिधी । अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यासह नरहरी झिरवळ आणि दौलत दरोडा हे आमदार राष्ट्रवादी पक्षासोबतच असून ते दिल्लीहून मुंबईला रवाना झाले आहेत.

कालच अजित पवार यांच्यासोबत पक्षातील बहुसंख्य आमदार नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र अमळनेरचे अनिल भाईदास पाटील यांच्यासह दौलत दरोडा, नरहरी झिरवळ आणि अण्णा बनसोडे यांचा मात्र थांगपत्ता लागत नव्हता. अनिल पाटील यांनी कालच आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले होते. तर दौलत दरोडा हेदेखील प्रसारमाध्यमांच्या संपर्कात होते. या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी अनिल भाईदास पाटील, नरहरी झिरवळ आणि दौलत दरोडा हे तिन्ही आमदार दिल्लीहून मुंबईला निघाल्याचे वृत्त आहे. यामुळे आता अजित पवारांसोबत फक्त अण्णा बनसोड हेच एकमेव आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा हे या तिन्ही आमदारांना घेऊन मुंबई येथे येत असल्याचे वृत्त असून त्यांनी फेसबुकवर या आमदारांसोबतची प्रतिमा शेअर केली आहे.

Protected Content