Home Uncategorized उंटावदच्या कृष्णराजची जळगाव लिटल चॅम्प प्रिमीयर क्रिकेट लिगसाठी निवड

उंटावदच्या कृष्णराजची जळगाव लिटल चॅम्प प्रिमीयर क्रिकेट लिगसाठी निवड


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा लिटल चॅम्प प्रिमीयर लिग स्पर्धेसाठी उंटावद येथील चि. कृष्णराज महेश पाटील याची 14 वर्षांखालील क्रिकेट संघात विकेटकीपर-फलंदाज म्हणून निवड झाली आहे. रविवार, दि. 13 एप्रिल रोजी फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात झालेल्या निवड चाचणीत त्याने ही संधी मिळवली.

कृष्णराज हा किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याच्या निवडीचे यावल तालुका पत्रकार क्रिकेट संघ आणि परिसरातून कौतुक होत आहे. मंगळवारपासून निवड झालेल्या खेळाडूंचे सराव प्रशिक्षण सुरू होणार असून, पहिली क्वालिफाय टूर्नामेंट अमरावती येथे, तर दुसरी जळगाव येथे होणार आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी खेळाडूंना LCPL च्या बोली प्रक्रियेत प्रवेश मिळवून देण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

कृष्णराज नियमितपणे यावल तालुका पत्रकार क्रिकेटर संघात सराव करतो. त्याच्या या यशाबद्दल संघाचे कर्णधार शेखर पटेल, भरत कोळी, सुनिल गावडे, सुधीर चौधरी, तेजस यावलकर, रणजित भालेराव, हर्षल अंबेकर, योगेश सोनवणे, सलीम पिंजारी, ज्ञानदेव मराठे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकारांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Protected Content

Play sound