पहूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पहूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहूर पेठेतील आंबेडकर नगर येथून डॉ. आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमेची ट्रॅक्टरवर सजावट करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. ही मिरवणूक पहूर पेठ, पहूर कसबे, बस स्टँड मार्गे जामनेर रोडवरील बुद्ध विहार येथे संपन्न झाली.

बुद्ध विहार येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा, ॲड. संजय पाटील, शैलेश पाटील, रामेश्वर पाटील, पत्रकार मनोज जोशी, प्रल्हाद वानखेडे, विश्वनाथ वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला ईश्वर बाबूजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, किरण खैरनार, दिलीप भालेराव, अशोक पाटील, पत्रकार गणेश पांढरे, बाबुराव पांढरे, कैलास चव्हाण, पहूर पेठचे सरपंच अफजल तडवी, पहूर कसबेचे उपसरपंच राजू जाधव, अनिल मोरे, महेश मोरे, समाधान मोरे, विजय मोरे, तायडे साहेब, सुषमा चव्हाण यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनकर सुरडकर गुरुजी यांनी केले, तर माजी उपसरपंच रवींद्र मोरे यांनी आभार मानले.

Protected Content