शरद पवारांसोबत राहून ही अजित पवारांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही – राज ठाकरे

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यातील महायुतीचे उमेदवार भाजप नेते मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली. लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात १३ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीपातीच्या राजकारणावरून टीका घेतली यासोबतच त्यांनी अजित पवार यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही असे म्हणत त्यांची स्तूतीही केली. शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. हे जातीपातीचे विष १९९९ सालापासून कालवायला सुरूवात झाली आहे. माझे अजित पवारांबद्दल अनेक मतभेद असतील. पण अजित पवारांनी जातीपातीचं राजकारण कधीच केले नाही. हे विष तोपर्यंत कालवले गेले होते. काही माहिती नाही कशाचा काही संबंध नाही. का विष कालवलं गेलं कारण तुम्ही जातीकडे पाहावे आणि मतदान करत रहावं. कशाला लागतय तुम्हाला चांगले शहर. आम्हाला शहर बरबाद झालं तरी चालेल मात्र जातीवरून काही बोललं तर पेटतो. काहीच कारण नाही, याच मानसिकतेचा गैरफायदा घेणारी मंडळी तुमच्या समोर येत असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

Protected Content