माजी आ. महेंद्रबापू पाटील समर्थकांसह भाजपमध्ये दाखल !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एरंडोल मतदारसंघाचे माजी आमदार महेंद्रबापू पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.

आज जळगावात केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी एरंडोलचे माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, त्यांचे पुतणे नरेंद्रसिंग पाटील तसेच अन्य समर्थकांनी ना. गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.

याप्रसंगी ना. नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महेंद्रबापू आणि त्यांच्या सहकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, ना. अनिल पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, उमेदवार स्मिताताई वाघ यांच्यासह नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content