मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन मूलभूत सोयी सुविधा पुरवणार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. वाढत्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांना उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विविध स्वरूपाच्या सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पुरविण्यात येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी व्हीलचेअर, स्तनदा माता, लहान अपत्ये असलेल्या महिला मतदारांसाठी पाळणाघर, गरोदर महिलांसाठी स्वतंत्र रांग, मदतीसाठी आशा वर्कर त्याचप्रमाणे शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, मतदान केंद्र बाहेर मंडपाची व्यवस्था अशा स्वरूपाच्या सोयी सुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या व्हिडिओद्वारे समाजमाध्यमातून या सुविधांबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. अशी माहिती अनिकेत पाटील (जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रा.पं. जि.प.जळगाव) यांनी दिली आहे.

 

Protected Content