जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दादावाडीतील जैन मंदीरासमोरून वाळूची चोरी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलीसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी गुरूवार ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दादावाडीमधील जैन मंदीर समोर पोलीस कर्मचारी गुरूवारी ६ जुलै रोजी सकाळी ५ वाजता गस्तीवर असतांना ट्रॅक्टरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असतांना पोलीसांना आढळून आले. त्यानंतर पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टरवर थांबविले. ट्रॅक्टरचालक मनोज दगडू सपकाळे वय-२४ रा. निमखेडी ता.जि.जळगाव याला वाळू वाहतूकीबाबत परवानगी आहे का अशी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यानंतर पोलीसांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रविण कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरूवारी ६ जुलै रोजी सकाळी १० वाजता ट्रॅक्टर चालक मनोज दगडू सपकाळे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपविभागीय अधिकारी आप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौदाजर अनिल सोनवणे, पोकॉ. जितेंद्र सोनवणे, प्रविण सोनवणे यांनी केली.