कासोदा पोलिसांचे गावठीदारू अड्यांवर धाड सत्र

 

कासोदा, प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यात बहुतांश ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असुन येथील कासोदा पोलिस स्टेशन हद्दीतील गावठी हातभट्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.

अंतुर्ली खुर्दे येथे ३ मार्च रोजी स.पो.नि.रविंद्र जाधव यांनी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार भागवत पाटील, पो.कॉ.जितेश पाटील , पो.ना. शरद राजपूत , पो.कॉ नितीन पाटील, पो.कॉ इम्रान पठाण यांच्या पथकाने संध्याकाळी ४. ३० व ७ च्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला होता. त्याच पद्धतीने दि. ६ रोजी पहाटे ७ ;३० च्या सुमारास कासोदा नजिक असलेल्या जानफळ फरकांडे येथेही जनफळ शिवारातील शेतात राजु दला भिल यांच्या गावठी हातभट्टी वर धाड टाकत ३० लिटर गावठी दारूसह प्लास्टिक ड्रमभरलेले ४०० लिटर कच्चे रसायन , १३९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून राजू दला भिल यांच्यावर कासोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने स.पो.नि.रविंद्र जाधव यांच्या पथकासह कासोदा पोलीस स्टेशन चे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. परंतु, कासोदा पोलीस स्टेशन च्या हद्दीत गुटखा , तंबाखू , गावठी दारू विक्री हे देखील अवैध धंदे परिसरात जोरात सुरु असल्याचे दिसत आहे.  देवस्थानच्या १०० मीटर यार्डात दारू विक्रीवर बंदी घातली असूनही कासोद्यात बहुतांश ठिकाणी दारू विक्री सुरू आहे . या सर्वांवर देखील एकही ठोस कार्यवाही येथील स्थानीक पोलीस स्टेशन कडून झालेली दिसत नाही , यावर देखील पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून आळा घालावा व यांकडे ही पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी देखील मागणी गावातील सुज्ञ नागरीक करीत असल्याची चर्चा चौका चौकात सुरू आहे.

Protected Content