यस बँकेवर निर्बंध लागण्याच्या एक दिवस आधीच गुजरातच्या कंपनीने काढले २६५ कोटी

मुंबई (वृत्तसंस्था) रिझर्व्ह बँकेने यस बँकेवर निर्बंध घालण्याच्या एक दिवस आधीच गुजरातच्या वडोदरा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट या कंपनीने तब्बल २६५ कोटी रूपयांची संपूर्ण रक्कम दुसऱ्या बँकेत वळती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या व्यवहाराकडे संशयाने बघितले जात आहे.

 

केंद्राकडून स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी बडोदा पालिकेला स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ही रक्कम देण्यात आली होती. परंतू पालिकेने स्थापन केलेल्या बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटने येस बँकेवर निर्बंध लादले जाण्यापूर्वी २६५ कोटी रुपये काढले, अशी माहिती बडोदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बडोदा महापालिकेचे उपआयुक्त सुधीर पटेल यांनी दिली. ‘केंद्राने स्मार्ट प्रकल्पासाठी अनुदान दिले. ती रक्कम आम्ही येस बँकेच्या स्थानिक शाखेत जमा केली होती. मात्र बँकेसमोर आर्थिक समस्या असल्याचे लक्षात येताच आम्ही तो निधी बँक ऑफ बडोदात जमा केला, असे पटेल यांनी सांगितले.

Protected Content