अमृत आहाराचे बिले रखडली ; आंदोलनाचां इशारा

 

चोपडा, प्रतिनिधी । आदिवासी भागातील अंगणवाड्याच्या अंतर्गत येणाऱ्या गरोदर स्तनादा माता यांच्यासाठी एक वेळ पूर्ण जेवणाची व्यवस्था सरकारने अमृत आहार योजनेअंतर्गत केलेली आहे. मात्र, याची बिले रखडली असल्याने अंगणवाडी सेविकांना आर्थिक अडचणींना तोंड लागत आहे. ही बिले सरकाने त्वरित अदा करावीत नाहीतर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकतर्फे देण्यात आला आहे.

आदिवासी भागातील अंगणवाडी सेविकांनाच बहुतांशी अमृत आहार पुरवण्याचे काम कामाला सरकार जूपले आहे. प्रत्येक लाभार्थी मागे पंचवीस रुपये दराने खाऊ पुरवला जातो. जळगाव जिल्ह्यात १७५ गावे पाडे त आदिवासी बहुल अंगणवाडी केंद्रे असून त्यात सुमारे १.५/२ हजार लाभार्थी अमृता लाभ घेतात. या लाभार्थींना वर्षातून तीनशे दिवस जेवण पुरवली जाते. परंतु, गेल्या दहा महिन्यापासून या महिलांना अमृत आहाराचे पेमेंटच देण्यात आलेले नाही. रोज एका अंगणवाडीला सरासरी पाचशे रुपये खर्च गृहीत धरला तर तीनशे दिवसांचे दीड लाख रुपये घेणे होतात. अशा तऱ्हेने दहा-अकरा महिन्यांचे अमृत आहार पुरवणाऱ्या सर्वच महिलांची प्रत्येकी सुमारे दीड लाख रुपये देणे सरकारने दिलेले नाही. गेल्या १०/११ महिन्यात सेविकांना मिळालेले बहुतांशी संपूर्ण मानधन अमृत आहाराच्या किराणा भाजीपाला व गहू ज्वारी या जिन्नसांची उधारी भरण्यातच गेले. शिवाय मानधन दोन दोन तीन तीन महिने मिळत नाही. यात उधारी थकते. अशावेळी थकलेल्या उधारीवर नाईलाजास्तव व्याज लावून घ्या पण माल द्या अशी बोली करून नवीन माल घ्यावा लागतो. त्यामुळे आदिवासी भागातील सेविका यांची खाऊ पुरवता पुरवता व घर चालवता चालवता नाकी नऊ येत आहे. तरी या आहार पुरवणाऱ्या येरवड्यातील महिलांची आहाराची थकीत बिले त्वरित अदा करा अशी मागणी कामगार नेते कॉ. अमृत महाजन यांनी केली आहे. अन्यथा जळगाव जिल्हा परिषदवर मोर्चा नेण्यात येईल असा इशारा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकतर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

Protected Content