सप्तश्रृंगी गडावरून उडी घेत प्रेमयुगलाने जीवन संपवले

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सप्तश्रृंगी गडावरून उडी मारून प्रेमीयुगलाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियांका संतोष तिडके आणि मंगेश राजाराम शिंदे या तरूण-तरूणीचे नावे होती. त्यांनी ४०० फुट खोल दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. तरूण २४ तर तरूणी १६ वर्षांची होती. ते सात दिवसांपासून बेपत्ता होते.

अखेर आठवडाभरांनंतर त्यांचा कुजलेला मृतदेह गडाच्या पायथ्याला असलेल्या गुराख्यांनी पाहिला असता पोलिस पाटील विजय चव्हाण यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाजवळ आढळलेल्या साहित्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

Protected Content