दारू पिण्यासाठी बसू न दिल्याने हॉटेलवर दगडफेक

भुसावळ प्रतिनिधी | येथील हॉटेल अनिलमध्ये नियमांचे उल्लंघन करून दारू पिण्यासाठी बसू द्यावे या कारणासाठी टोळक्याने दगडफेक केल्याची घटना रात्री घडली आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्‍या हॉटेल अनिलमध्ये परमीटरूम आणि बियरबार आहे. मात्र सध्या निर्बंध सुरू असल्याने येथे फक्त पार्सल व्यवस्था उपलब्ध आहे. दरम्यान, एका ग्राहकाने हॉटेलमध्ये बसू द्यावे म्हणून वेटरसोबत वाद घातला. त्यास दारू पिण्यासाठी बसू देण्यास नकार दिल्यावर हा वाद वाढला. यानंतर त्याने फोन करून इतरांना बोलावले. काही वेळातच चार ते पाच तरुणांच्या टोळक्याने हॉटेल समोरील दोन ते तीन दुचाकी ढकलून दिल्या. तसेच रस्त्यावर दगडफेक केल्याने काहीशी पळापळ झाली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत याबाबत तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!