ट्रक्टर पळवून नेल्याप्रकरणी चाळीसगाव पोलीसात गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी । धुळे रोड आदर्शनगर परिसरातील हनुमान मंदिराजवळील पोलिस मैदानावर लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. मात्र कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून ट्रॅक्टरचा मालक आणि चालक आज सकाळी पोलिस मैदानावरून ट्रॉली घेऊन पळून गेले. याप्रकरणी शहर पोलिस स्टेशनमध्ये वाहन मालक आणि चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, विनोद एकनाथ भोसले (वय-२३ रा. तरवाडे ता. चाळीसगाव) हा महिंद्रा कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टरात अवैध मुरूम घेऊन धुळे रोड, आदर्शनगर भागातील हनुमान मंदीराजवळ येथून जात असताना. चाळीसगाव तहसील कार्यालयामधील शहर तलाठी विनोद मेन (वय-४३) यांनी धडक कारवाई करत ट्रॅलीसह जप्त करून पोलिस ग्राऊंडवरून (दि. २१ फेब्रुवारी) रोजी दुपारी २:०० वाजता लावण्यात आले. मात्र मालक बापू काळे (रा. खरजई ता. चाळीसगाव) व चालक विनोद एकनाथ भोसले यांनी कारवाई टाळण्यासाठी आज सकाळी पोलिस ग्राऊंडवरून ट्रॅलीसह पळवून नेली. त्यामुळे तलाठी विनोद कृष्णराव मेन यांनी मला न विचारता ट्रॅलीसह पळवून नेली म्हणून मालक व चालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात आज सायंकाळी विविध कलमान्वये फिर्याद दाखल केली. भा.द.वि. कलम ३७९, १८६ व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू असणार आहे.

Protected Content