Home Cities अमळनेर झाडी येथील जि.प. शाळेत मंगळग्रह संस्थानतर्फे राबविला उपक्रम

झाडी येथील जि.प. शाळेत मंगळग्रह संस्थानतर्फे राबविला उपक्रम

0
69


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील झाडी येथील जिल्हा परिषदेतच्या शाळेत वसंतराव नाईक यांच्या जयंतीच्या औचित्य साधीत विध्यार्थ्याना पाणी पिण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या.

मंगळ ग्रह संस्थान अमळनेर मार्फत तालुक्यातील बऱ्याच शाळांमधील शालेय विध्यार्थ्याना पाणी पिण्याची बाटली उपलब्ध करून देण्यात येऊन शाळेतील प्रत्येक विध्यार्थ्याना वाटप करण्यात आल्या. झाडी येथे जिल्हा परिषद शाळेचे शालेय समिती अध्यक्ष भैय्या पाटील, गावातील पालक उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक जाईदखा पठाण यांनी मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन व आभार उपशिक्षका माया बंजारा यांनी केले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विध्यार्थ्याना चांगल्या प्रतीच्या पाणी पिण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.


Protected Content

Play sound