जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेची कार्यकारिणीची पुढील चार वर्षासाठी निवड करण्यात आली असून त्यात माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बुधवारी ५ जुलै रोजी गोदावरी फाऊंडेशन च्या वैद्यकीय महविद्यालयात झालेल्या कार्यकारणीच्या पहिल्या सभेत त्यांचा गौरव करण्यात आला. उपाध्यक्ष जाफर शेख यांनी शाल, डॉ प्रो अस्मिता पाटील यांनी पुष्पगुच्छ व प्रो डॉ अनिता कोल्हे यांनी फुटबॉल देऊन डॉ उल्हास पाटील यांचा सत्कार केला. कार्यकारणी पुढील प्रमाणे मुख्य आश्रयदाते – माजी मंत्री सुरेश दादा जैन व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन.सल्लागार अतुल जैन व माजी कार्याध्यक्ष मोहम्मद आबिद अध्यक्ष डॉक्टर उल्हास पाटील उपाध्यक्ष डॉ.प्रो. अस्मिता पाटील व पिंच बॉटलींगचे जफर शेख, सचिव – फारुक शेख खजिनदार शेखर देशमुख सहसचिव प्रोफेसर डॉक्टर अनिता कोल्हे (जळगाव)व एन आय एस फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन (भुसावळ)संचालक मंडळ डॉक्टर प्रभाकर बडगुजर ( अमळनेर),इम्तियाज शेख (भुसावळ), भास्कर पाटील, मनोज सुरवाडे, ताहेर शेख, एडवोकेट आमिर शेख (सर्व जळगाव) जलाल शेख (जामनेर)राज्य स्तरीय स्पर्धेचे आयोजनअध्यक्ष पदाचा प्रभार घेताच डॉ पाटील यांनी लहान विद्यार्थीवर फोकस करून त्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्याचे आदेश पारीत केले.लवकरच या स्पर्धेचे आयोजन विफा च्या मान्यतेने घेण्यात येतील असे सचिव फारुक शेख यांनी घोषित केले.
फोटो १)फुटबॉल संघटनेची नवीन कार्यकारिणी२) डॉ उल्हास पाटील यांचे सत्कार करतांना जाफर शेख,प्रो डॉ अस्मिता पाटील, प्रो डॉ अनिता कोल्हे, फारुक शेख आदी दिसत आहे