भुसावळ नगरपरिषद अंतर्गत रस्ता डांबरीकरण कामांचे भूमिपूजन

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथे भुसावळ नगरपरिषद अंतर्गत खडका रोड सुभाष पोलीस चौकी ते रजा टॉवर ते नशनल हायवे (खडका चौक) पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण या विकास कामाचे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे विशेष अतिथी तर आमदार संजयजी सावकारे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. शहरांतर्गत रस्ता डांबरीकरण विकास कामासाठी रु.८८ लाख ९८ हजार ९१४ निधी मंजूर करण्यात आलेला असून त्यामुळे भुसावळ शहरवासियांना फायदा होणार आहे.

यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, मुख्याधिकारी संदिप चिद्रावार, सुनिल नेवे, प्रमोद नेमाडे, शफी पहेलवान, शरीफ ठेकेदार, बोधराज चौधरी, ऐजाज खान, किरण कोलते, पृथ्वीराज पाटील, सुमित बऱ्हाटे, हर्षल चौधरी आदींची उपस्थिती होती.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!