भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गिरड येथील विवाहितेला माहेरहून २ लाख रूपये आणावे अशी मागणी करत शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पतीसह सासरकडील व्यक्तींविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील गिरड येथील माहेर असलेल्या रिजवाना गफ्फार पिंजारी (वय-२३) यांचा विवाह जळगाव तालुक्यातील असोदा भादली येथील गफ्फार सुपडू पिंजारी याच्याशी रितीरिवाजानुसार मे-२०१५ मध्ये झाला. लग्नानंतरचे दोन वर्ष चांगले गेल्यानंतर पती गफ्फार याने घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणावे अशी मागणी विवाहितेकडे केली. दरम्यान, विवाहितेने पैशांची पुर्तता न केल्याने तिला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच सासू, सासरे, जेठाणी, जेठ, नणंद यांनी देखील पैशांची मागणी केली. पैसे आणले नाही तर जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्यात. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी ३१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता पती गफ्फार सुपडू पिंजारी, सासरे सुपडून अब्दुल पिंजारी, सासू नुरजान सुपडू पिंजारी, जेठ अमिन सुपउू पिंजारी, जेठाणी यास्मिन अमिन पिंजारी, नंणंद शाहीर शकील पिंजारी आणि नंदोईभाऊ शकील पिंजारी सर्व रा. आसोदा भादली ता. जि.जळगाव यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तात्याबा नागरे करीत आहे.