अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली : शेतकरी नेते रविकांत तुपकर

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे हेडलाईन मॅनेजमेंट असा प्रकार असून मोठ मोठ्या घोषणा करत असतांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसल्याची प्रतिक्रीया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ वर्षाचा आज सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प म्हणजे २०२४ च्या निवडणुका व परिभागाचे लोक डोळ्यासमोर ठेवून घोषित करण्यात आल्याचं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटले आहे. तसेच केंद्राने मागील ५ वर्षाचा आधी करता केलेल्या घोषणांचा ऑडिट करून तो अर्थसंकल्प किती टक्के पूर्ण केला गेला. याची पडताळणी करावी व एक प्रकारे हा हेडलाईन मॅनेजमेंटचा प्रकार असल्याचे म्हणाले. मोठ मोठ्या घोषणा करत असताना शेतकऱ्यांच्या तोंडाला पाण पुसल्याचेही यातून दिसून येते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांकरिता खाजगी आणि सरकारी मॉडेल जे घोषित करण्यात आले आहे.ते देखील शेतकऱ्यांचे उपयोगाचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Protected Content